बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्या चित्रपटांवर बहिष्कार चालूच ठेवा ! – तान्या, संपादिका, ‘संगम टॉक्स’ यूट्यूब वाहिनी

तान्या

‘गेली काही वर्षे इस्लामला महत्त्व देणारे आणि हिंदु धर्मविरोधी चित्रपट बनवले जात आहेत. नायक मुसलमानधार्जिणा, तर खलनायक हिंदूंना दाखवले जाते. एवढेच नव्हे, तर चित्रपटांतून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्कार घालत असल्याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे. यात मोठ्या प्रमाणात पैशांचा खेळ आहे. बॉलीवूडने त्यांना पैसे पुरवणारी जी टोळी आहे, त्यांना आपले मायबाप मानले आहे. प्रत्यक्षात ते ‘प्रेक्षक मायबाप आहेत’, हे विसरले आहेत; म्हणूनच याची जोपर्यंत त्यांना जाणीव होत नाही, तसेच ते क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्या चित्रपटांवरचा बहिष्कार चालू ठेवला पाहिजे.’

(जानेवारी २०२३)