विद्यार्थ्यांना विष देणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – आयतुल्ला खामेनी

इराणमध्ये ५ सहस्र विद्यार्थ्यांना विष देण्याचे प्रकरण

इराणचे प्रमुख आयतुल्ला खामेनी

तेहरान (इराण) – इराणमधील २३० शाळांमधील अनुमाने ५ सहस्र विद्यार्थ्यांना विष देण्यात आल्याच्या तक्रारीवर इराणचे प्रमुख आयतुल्ला खामेनी यांनी म्हटले आहे, ‘जर विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक विष देण्यात आले असेल, तर तो अक्षम्य अपराध असून दोषींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे.’ विष दिल्यामुळे हे विद्यार्थी आजारी पडले आहेत.


या प्रकरणावरून इराणमध्ये आंदोलन केले जात आहे. विद्यार्थ्यांना विष कुणी आणि का दिले ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.