भारतीय वंशाचे अरुण सुब्रह्मण्यम् यांची न्यूयॉर्क जिल्ह्याचे न्यायमूर्ती म्हणून निवड !

वॉशिंग्टन (अमेरिका) – भारतीय वंशाचे अरुण सुब्रह्मण्यम् हे न्यूयॉर्क जिल्ह्याचे न्यायमूर्ती म्हणूनही पदभार स्वीकारणार आहेत. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी हा निर्णय घोषित केला. सुब्रह्मण्यम् यांनी वर्ष २००४ मध्ये कोलंबिया लॉ स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. वर्ष २००६ ते २००७ या कालावधीत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती रूथ बेड जिन्सबर्गसाठी लिपिक म्हणून सुब्रह्मण्यम् यांनी काम केले आहे.

‘नॅशनल एशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशन’चे कार्यवाहक अध्यक्ष अब क्रूझ म्हणाले की सुब्रह्मण्यम् एक अनुभवी अधिवक्ता आहेत, त्यांच्याकडे निःस्वार्थ सेवेची भावना आहे आणि ते पूर्ण समर्पित होऊन काम करतील.