पुणे – महापालिकेने प्लास्टिक कचरा निर्मूलनाकरता आयोजित केलेल्या ‘प्लास्टिक कचरा संकलन’ स्पर्धेला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेच्या सर्वच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ३ सहस्र २४८ किलो प्लास्टिकच्या बाटल्या जमा झाल्या आहेत. या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पहाता महापालिकेने १५ मार्चपर्यंत या स्पर्धेची मुदत वाढवली आहे.
महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी १ फेब्रुवारी या दिवशी ‘प्लास्टिक कचरा संकलन’ स्पर्धेची घोषणा केली होती. ‘कमिन्स इंडिया’ या संस्थेच्या सहकार्याने होणार्या या स्पर्धेतील विजेत्यांना ‘स्मार्टफोन’, ‘स्मार्टवॉच’, ‘इलेक्ट्रिक बाईक’ अशा स्वरूपाची पारितोषिकेही अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी घोषित केली होती.
संपादकीय भूमिकापुणे महापालिकेने प्लास्टिकच्या कचर्याचे निर्मूलन करण्यासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. यासमवेत सातत्याने जनतेचे प्रबोधन करून ‘पुणे प्लास्टिक कचरामुक्त करावे’, हीच जनतेची अपेक्षा ! |