मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्‍या २ मुसलमान गोतस्‍करांना अटक

‘मारुति ८००’ गाडीत कोंबून केली होती चोरी !

मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे वासरू चोरणार्‍या २ मुसलमान गोतस्‍करांना अटक

मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) – येथे रात्री मुसलमानांनी गायीच्‍या वासराला ‘मारुति ८००’ या चारचाकी गाडीमध्‍ये घालून चोरून नेले. या घटनेचे सीसीटीव्‍ही चित्रण समोर आल्‍यानंतर पोलिसांची चौकशी करून २ मुसलमान गोतस्‍करांना अटक केली आहे. या दोघांना पकडतांना त्‍यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात एक गोतस्‍कर घायाळ झाला. पोलिसांनी आरोपींकडून चारचाकी गाडीही जप्‍त केली आहे.

संपादकीय भूमिका

गोहत्‍याबंदी कायदा केला म्‍हणजे गुन्‍हे थांबतील, असे नाही, तर त्‍याची कठोर कार्यवाही करून संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा होण्‍याचीही आवश्‍यकता आहे !