इस्रायलने सीरियाच्या राजधानीवर डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे ५ जण ठार

दमास्कस (सीरिया) – इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस येथील निवासी इमारतींवर क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

२ दिवसांपूर्वी सीरियामध्ये झालेल्या एका आतंकवादी आक्रमणात ५३ लोकांचा मृत्यू झाला. या आक्रमणामागे इस्लामिक स्टेट असल्याचे सांगण्यात येत आहे. हे आक्रमण इराणची सीरियामध्ये होत असलेली घुसखोरी रोखण्यासाठी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.