‘रामसेतू’ला राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याची याचिका सुनावणी सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे सर्वाेच्च न्यायालयाकडून मान्य

नवी देहली – भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची ‘रामसेतू हा राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याचे केंद्रशासनाला निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुनावणीच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले. ‘घटनापिठासमोरील याचिकांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही या याचिकेचा सूचीमध्ये समावेश करू’, असे न्यायालय म्हणाले.

‘या सूत्रावर आतापर्यंत काहीही निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे, आता ही जनहित याचिका सुनावणीसाठी घेतली जावी’ असा युक्तीवाद डॉ. स्वामी यांनी केली होती.