भोर (पुणे) येथे देयक संमत करण्‍यासाठी ७० सहस्र रुपयांची लाच घेतांना उपअभियंत्‍याला अटक !

पुणे – ग्रामीण पाणीपुरवठा योजेतील पाईप खरेदी देयक संमत करण्‍यासाठी ठेकेदाराकडून ७० सहस्र रुपयांची लाच घेणारा उपअभियंता जयंत ताकवले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. ही कारवाई भोर पंचायत समिती कार्यालयाच्‍या आवारामध्‍ये करण्‍यात आली. ताकवले याच्‍या विरोधात भोर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. ठेकेदारास लाच देणे मान्‍य नसल्‍याने त्‍यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्‍ट केली होती.

संपादकीय भूमिका

‘भ्रष्‍टाचाराने बरबटलेला भारत’, ही प्रतिमा पुसण्‍यासाठी कुणीही लाच मागितल्‍यास लाच न देता त्‍याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करा !