गरजेच्या वेळी कामी येतो तोच खरा मित्र !

भूकंपानंतर तात्काळ साहाय्य पाठवणार्‍या भारताचे तुर्कीयेने मानले आभार !

नवी देहली – ‘तुर्कीये आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये ‘दोस्त’ या शब्दाचा अर्थ एकच आहे. आमची एक तुर्की म्हण आहे, ‘दोस्त कारा गुंडे बेल्ली ओलुर’ (मित्र तोच, जो गरजेच्या वेळी कामी येईल) खूप खूप धन्यवाद, भारत’, असे ट्वीट करत भारतातील तुर्कीयेचे राजदूत फिरात सुनेल यांनी भारताने तुर्कीयेला केलेल्या साहाय्यासाठी आभार मानले आहेत. तुर्कीयेमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपावर भारताने तात्काळ पथक पाठवल्यावरून, तसेच पंतप्रधान मोदी यांनी शक्य तितके साहाय्य करण्याचे आश्वासन दिल्यावरून त्यांनी हे आभार व्यक्त केले आहेत. तत्पूर्वी भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन् यांनी तुर्कीयेच्या दूतावासात जाऊन शोक व्यक्त केला होता.

_____________________________________ 

संपादकीय भूमिका

तुर्कीयेने काश्मीरप्रश्नावरून सातत्याने पाकचे समर्थन केले. भारतात मुसलमानांवर होत नसलेल्या अन्यायावरून भारतावर आरोप केले, तरीही भारताने तुर्कीयेला हे साहाय्य केले आहे, यावरून ‘भारताचे मन मोठे आहे’, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !