१ सहस्र भाविक सहभागी होणार !
नाशिक – १९ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत १०८ वा कुंडीय महायज्ञ सोहळा वृंदावन येथे होणार आहे. तब्बल ४० एकरवरील या यज्ञ सोहळ्यात ४ ते ५ लाख भाविक सहभागी होणार असून यात नाशिक शहर आणि जिल्ह्यातून १ सहस्रांहून अधिक भाविक सहभागी होतील. सोहळ्यासाठी येणार्या सर्व भाविकांची वृंदावन येथे निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज यांनी दिली.
१. विश्वशांतीसह सनातन धर्माच्या प्रचारासाठी २० डिसेंबर १९७१ या दिवशी पहिला यज्ञ झाल्याची आख्यायिका आहे.
२. गेल्या ५२ वर्षांत देशातील विविध १०७ शहरांत १०७ श्री लक्ष्मीनारायण महायज्ञ करण्यात आले आहेत. पुढील महायज्ञ आता वृंदावन येथे होत आहेे. महायज्ञाविषयी समाजात माहिती व्हावी, यासाठी श्री स्वामी भरतदासाचार्य यांनी नाशिकचा दौरा केला.
३. वैदिक विधीच्या माध्यमातून संसारातील प्रत्येक व्यक्ती सुखी व्हावी, या उद्देशाने श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज यांनी १०८ श्री लक्ष्मीनारायण महायज्ञाचा संकल्प केला होता.
४. सोहळ्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. देशभरातील ७५० ब्रह्मवृंद या सोहळ्याचे पौरोहित्य करतील.
५. श्री स्वामी भरतदासाचार्य महाराज हे २५ वर्षांचे असतांना त्यांनी वर्ष १९७१ मध्ये मध्य प्रदेशमधील कटनी या ठिकाणी पहिला यज्ञ केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, भाग्यनगर, पश्चिम बंगाल, आसाम आणि हरियाणा अशा राज्यांतील विविध शहरांत आतापर्यंत १०७ यज्ञ यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.
६. वर्ष २००३ मध्ये हा यज्ञ सोहळा नाशिक येथे कुंभमेेळा असतांना पार पडला होता. त्या वेळी देशातील लाखोंच्या संख्येने भाविक नाशिक येथे आले होते.