तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ)

मदुराई (तमिळनाडू) – येथे ‘हिंदु मक्कल कत्छी’ (हिंदु जनता पक्ष) पक्षाचे दक्षिण मदुराई उपसचिव मणीकंदन (वय ४१ वर्षे) यांची ३१ जानेवारीला हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मणीकंदन यांचे येथील एम्.के. नगरमध्ये दागिन्यांचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घरी परतत असतांना अज्ञातांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्यांची हत्या केली. या हत्येमागील कारण आणि आक्रमणकर्ते यांची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.

संपादकीय भूमिका

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्याने हिंदूंचे आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण कसे होणार ?