इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना अटक करण्यात आली. अटकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘माझ्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात आहे’, असा आरोप केला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या अटकेचा निषेध केला आहे. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये रशीद गृहमंत्री होते. यापूर्वी त्यांच्या सरकारमधील एक मंत्री फवाद चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.
#FirstOnTNNavbharat: पाकिस्तान में इमरान खान के करीबी गिरफ्तार, पूर्व गृह मंत्री शेख रशीद को किया गया गिरफ्तार@spbhattacharya #Pakistan #ImranKhan #SheikhRasheed pic.twitter.com/KtIHPVbNDo
— Times Now Navbharat (@TNNavbharat) February 2, 2023
भारताशी अणूयुद्ध करण्याची दिली होती धमकी !
शेख रशीद यांनी मंत्री असतांना भारताशी अणूयुद्ध करण्याची धमकी दिली होती. ते म्हणाले होते की, पाकिस्तानकडे १२५ ग्रॅम ते २५० ग्रॅम वजनापर्यंतचे अणूबाँब आहेत. ‘हे अणूबाँब इस्लाम मानणार्यांना हानी पोचवत नाहीत’, असाही दावा त्यांनी केला होता. (भारताशी एक सहस्र वर्षे युद्ध करण्याची दर्पाेक्ती करणारे पाकचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना पाकनेच फाशी दिली होती, हे पहाता पाकचे नेते त्यांच्याच कर्माने मरत आहेत. ते भारताचे काहीही वाकडे करू शकत नाहीत ! – संपादक)