‘बीबीसी’वर बंदी घालण्याची मागणी !

भारताच्या मानचित्रातून काश्मीरला वगळले !

‘बीबीसी’ने भारताच्या मानचित्रातून काश्मीरला वगळले

नवी देहली – ‘बीबीसी’ने भारताच्या मानचित्रातून (नकाशातून) काश्मीरला वगळल्याचे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाले. वर्ष २०१५ मधील बीबीसीच्या व्हिडिओमध्ये हा नकाशा दाखवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता बीबीसीवर भारतामध्येच पूर्ण बंदी घालण्याची मागणी सामाजिक माध्यमांतून केली जाऊ लागली आहे. यापूर्वीच बीबीसीने वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवरून तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा माहितीपट बनवला होता. या माहितीपटावर भारताने बंदी घातली आहे.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

संपादकीय भूमिका

कधी भारताच्या, तर कधी भारताच्या पंतप्रधानांच्या विरोधात गरळओक करणार्‍या ‘बीबीसी’वर सरकार बंदी का घालत नाही ?