माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे !

  • लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचा आरोप !

  • लडाखच्या समस्यांच्या संदर्भात ५ दिवसांपासून करत आहेत उपोषण !

लडाखमधील प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक

लेह – लडाखमध्ये अस्थिर उद्योग, पर्यटन आणि वाणिज्य क्षेत्रांत अडचणी येत आहेत. पर्यावरणाचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यासाठी मी आंदोलन उभे केले आहे; पण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप लडाखचे सुप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी केला आहे. या स्थितीच्या निषेधार्थ सोनम वांगचुक गेल्या ५ दिवसांपासून उपोषण करत आहेत. ‘मला समर्थन देण्यासाठी ३० जानेवारीला एक दिवसाचे उपोषण करू शकता’, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. सोनम वांगचुक यांना वर्ष २०१८ मध्ये ‘मॅगसेसे’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी खारदुंग दर्रा या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार होतो. तिथे तापमान उणे ४० डिग्रीपर्यंत घसरते; मात्र मला प्रशासनाने त्या ठिकाणी पोचू दिले नाही. मी आता याच जागेवरून उपोषण चालू ठेवले आहे.