राहुल गांधी यांनी श्रीनगरच्या लाल चौकात फडकावला तिरंगा

आज होणार भारत जोडो यात्रेची सांगता !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील लाल चौकात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावला.

३० जानेवारी या दिवशी राहुल गांधी श्रीनगरच्या एम्.ए. रोडवरील काँग्रेस मुख्यालयात तिरंगा फडकावतील आणि या यात्रेची सांगता होईल. यानंतर येथील एस्.के. स्टेडियमवर जाहीर सभा होणार असून त्यासाठी २३ विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.