घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिक गतीने करायच्या ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी व्हा आणि शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

१. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानुसार साधकांनी गतीने ग्रंथसेवा केल्यास त्याद्वारे समष्टी साधना झाल्याने त्यांचे आध्यात्मिक त्रास लवकर न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती शीघ्र होऊ शकणे

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले आहे, ‘घोर आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वी अधिकाधिक ग्रंथांची निर्मिती करून त्याद्वारे समाजाला साधक बनवणे’, ही सध्याच्या काळातील श्रेष्ठ समष्टी साधना आहे !’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथनिर्मितीचे कार्य अधिक गतीने करण्याच्या दृष्टीने एकप्रकारे अव्यक्त संकल्पच झालेला आहे. यानुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेतील साधकांनी ग्रंथनिर्मिती अधिक गतीने होण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथकार्यासाठी केलेल्या अव्यक्त संकल्पाच्या माध्यमातून त्या साधकांना आध्यात्मिक ऊर्जा मिळत असल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक त्रासही लवकर अल्प होत आहेत. सध्या सूक्ष्मातील आपत्काळाची (वाईट शक्तींच्या त्रासांची) तीव्रता वाढत असतांनाही ‘गुरूंच्या संकल्पानुसार तळमळीने सेवा करायचा प्रयत्न केला, तर गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) कार्यरत होण्याचे प्रमाणही कसे वाढते’, हे यातून शिकायला मिळते. यामुळे साहजिकच ग्रंथसेवेच्या माध्यमातून साधकांची आध्यात्मिक उन्नती लवकर होऊ शकते.

२. ११४ विषयांवरील ग्रंथमालिकांच्या अंतर्गत ५ सहस्रांहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध होण्याच्या कार्यात सहभागी व्हा !

परात्पर गुरु डॉक्टर संकलन करत असलेल्या ग्रंथांपैकी डिसेंबर २०२२ पर्यंत ३६० ग्रंथ-लघुग्रंथ यांची निर्मिती झाली आहे. सर्वसाधारणपणे १०० पृष्ठांचा (५०० केबीचा) एक ग्रंथ होतो.

परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित मनुष्य, साधना, कला, समाज, राष्ट्र, विश्व, अध्यात्म, धर्म आदी विषयांवरील ग्रंथमालिका आहेत. त्याचप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जीवनगाथा, त्यांचे कार्य आणि उत्तराधिकारी यांच्याशी संबंधित एकूण ११४ विषयांवरील ग्रंथमालिकाही आहेत. त्या अंतर्गत अनुमाने ५ सहस्रांहून अधिक ग्रंथांच्या निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.

वरील विषयांवरील ग्रंथमालिका अधिक वेगाने होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आपली आवड आणि क्षमता यांनुसार ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ करून घ्या !

३. ग्रंथनिर्मितीच्या सेवेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा !

वरील सर्व सेवांसाठी संगणकाचे जुजबी ज्ञान असणे, तसेच संगणकीय टंकलेखन करता येणे आवश्यक आहे. ग्रंथनिर्मितीशी संबंधित सेवा शिकण्यासाठी इच्छुकांना सनातनच्या आश्रमात २ – ३ आठवडे रहाता येईल. पुढे त्यांना सनातनच्या आश्रमात राहून किंवा घरी राहूनही सेवा करता येतील.’

– (पू.) संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१.२०२३)

३ अ. सेवा करू इच्छिणार्‍यांनी कळवायची माहिती

या सेवा करू इच्छिणार्‍यांनी वरील सारणीनुसार स्वत:ची माहिती सनातनच्या साधकांना संगणकीय धारिकेच्या किंवा लिखित स्वरूपात द्यावी आणि साधकांनी ती माहिती आपल्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, रामनाथी, फोंडा, गोवा. पिन ४०३ ४०१.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.