भूमीचा अपवापर केल्याप्रकरणी जिल्हाधिकार्यांचा आदेश

यवतमाळ, २८ जानेवारी (वार्ता.) – जिल्ह्यातील उमरी (तालुका पांढरकवडा) येथील ‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ला स्वातंत्र्यपूर्वकाळात ४२ एकर ५ गुंठे भूमी शासनाने ‘लीज’वर (‘लीज’ म्हणजे एखादी सामान्य मालमत्ता भाड्याने दिली जाणे. ‘लीज’ हा दोन पक्षांमधील करार असतो.) दिलेली होती. टीबी रुग्णालय, तलाव, शाळा आणि वसतीगृह यांसाठी लीजवर मिळालेल्या भूमीचा अपवापर होत असल्याप्रकरणी उमरी येथील जागरूक नागरिक श्री. विलास राजेश्वर आत्राम यांनी अमरावती आयुक्तांकडे तक्रार केली. (समाजकर्तव्य पार पाडणारे असे नागरिक सर्वत्र हवेत ! भूमीचा अपवापर होत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही ? – संपादक) याविषयीचा खटला यवतमाळ जिल्हाधिकार्यांकडे चालला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भूमीच्या अपवापराचा ठपका ठेवत मिशनला ४२ एकर ५ गुंठे भूमी शासनजमा करण्याचा आदेश दिला.
‘फ्री मेथाडिस्ट मिशन’ ही संस्था अनेक सामाजिक उपक्रम राबवत होती. त्यासाठी तत्कालीन गव्हर्नरांनी ७ मे १९४२ या दिवशी ४२ एकर ५ गुंठे ही ‘सी क्लास’ भूमी लीजवर मिशनला दिली. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेली ही मौल्यवान भूमी १९ एप्रिल १९७३ या दिवशी अन्य एका संस्थेला कुठल्याही अनुमतीविना मिशनने परस्पर हस्तांतरित केली. मोठ्या आर्थिक लाभासाठी हा व्यवहार करण्यात आला. (लीजवर मिळालेल्या भूमीचा परस्पर आर्थिक व्यवहार करून स्वार्थ साधू पहाणारी संस्था समाजहित काय जोपासणार ?- संपादक)
वाचा (सौजन्य : तरुण भारत) : उमरीच्या फ्री मेथॉडिस्ट मिशनकडील 42 एकर जागा शासनजमा
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न