प्रजासत्ताकदिनी अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांकडून ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा !

(एन्.सी.सी. म्हणजे नॅशनल कॅडेट कॉर्प्स)

(‘अल्लाहू अकबर’ म्हणजे अल्ला महान आहे)

अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात एन्.सी.सी. चे विद्यार्थी आक्षेपार्ह घोषणा देताना

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालयात २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वज फडकावतांना एन्.सी.सी.च्या (नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या) मुसलमान विद्यार्थ्यांनी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) आणि ‘नारा-ए-तकबीर’ (अल्ला सर्वांत मोठा आहे) अशा घोषणा दिल्या. त्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

१. विश्‍वविद्यालयाचे वसीम अली यांनी सांगितले की, व्हिडिओच्या आधारे विद्यार्थ्यांची ओळख पटवली जात आहे. त्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.  या घटनेच्या वेळी विश्‍वविद्यालयाचे कुलगुरु तारिक मन्सूर हेही विद्यार्थ्यांपासून काही अंतरावर उपस्थित होतेे. (कुलगुरु उपस्थित असतांना अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जाऊनही  कुलगुरु त्या थांबवत नाहीत, हे लक्षात घ्या ! अशा विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थी काय शिकत असतील ? आणि पुढे ते काय करतील ?, हेच यातून लक्षात येते ! अशी विश्‍वविद्यालये आता बंद करण्याचीच आवश्यकता आहे ! – संपादक)

२. याविषयी या विश्‍वविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि भाजपचे नेते डॉ. निशित शर्मा यांनी अलीगड पोलीस आणि विशेष पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांच्याकडे तक्रार केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताकदिनी धर्मांध घोषणा देण्यामागील काय अर्थ आहे ?  ही धार्मिक घोषणा त्यांची विचारसरणी दर्शवते. अशा घोषणा देऊन ते कोणता संदेश देऊ पहात आहेत ? संपूर्ण देश भारतीय राज्यघटनेसमोर नतमस्तक आहे. त्यामुळे अशी घोषणाबाजी करून ते भारतात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा घोषणा कशा दिल्या गेल्या ? आणि त्यामागे कोणती विचारसरणी कार्यरत आहे ?, यांचे अन्वेषण व्हायला हवे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेऊन आवश्यक ती कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

एन्.सी.सी.च्या विद्यार्थ्यांना पुढे सैन्यामध्ये प्रवेश घेता येतो किंवा अर्धसैनिक दलातही भरती होता येते. तेथे जर हे विद्यार्थी भरती झाले, तर ते कशा प्रकारचे काम करतील हे लक्षात येते. त्यामुळे अशांना आता हे शिक्षण द्यायचे का ? याचाही विचार करणे आवश्यक आहे !