अॅम्स्टरडॅम – देशातील इस्लामीविरोधी संघटना ‘पेगिडा’चे नेते एडविन वैगन्सफेल्ड यांनी येथील संसद भवनाच्या समोर कुराणाची पाने फाडली आणि ती पायाने तुडवली. अंततः त्यांनी कुराणाला आग लावली. २२ जानेवारी या दिवशी ही घटना घडली. त्यानंतर वैगन्सफेल्ड यांनी ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला.
Saudi Arabia, the UAE and other Gulf countries have issued a statement condemning the tearing of the #Quran by an extremist in the #Netherlands.https://t.co/q5dW7Mx9gY
— Al Arabiya English (@AlArabiya_Eng) January 25, 2023
या घटनेनंतर सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, जॉर्डन आदी इस्लामी देशांनी संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी स्विडन येथेही कुराण जाळण्यात आले होते.