इस्लाममध्ये तिरंगा फडकावला जात नसल्याचे सांगत मदरशांवर प्रजासत्ताकदिनी फडकावला इस्लामी झेंडा !

बाराबंकी (उत्तरप्रदेश) – येथील रामपूरमधील मदरशांवर प्रजासत्ताकदिनी इस्लामी झेंडा फडकावण्यात आला. गावकर्‍यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी हा झेंडा उतरवला. या प्रकरणी हाफीज महंमद सोहराब आणि महंमद तबरेज निजामुद्दीन रिजवान या दोघांना कह्यात घेण्यात आले आहे. ‘अशरफुल उलूम इमा इमदादिया साकिन’, असे या मदरशाचे नाव आहे. मदरशाच्या मौलवीने म्हटले की, आमच्या धर्मामध्ये तिरंगा फडकावला जात नाही. (ज्या देशात मौलवी यांच्या धर्मानुसार झेंडा फडकावला जातो, त्या देशात त्यांनी निघून जावे, असे आता सांगण्याची वेळ आली आहे. – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • एकीकडे भारतीय राज्यघटनेचे नाव घेऊन सर्व सुविधा लाटायच्या, सोयीनुसार राज्यघटनेचा वापर करायचा आणि त्याच राज्यघटनेने झेंडा फडकावण्यास सांगितले असतांना तेव्हा मात्र धर्माच्या नावाखाली तो फडकावण्यास नकार द्यायचा, अशा लोकांना आता देशातून हाकलण्याचीच आवश्यकता आहे !
  • देशातील मदरशांवर आता कायमस्वरूपी बंदी घालण्याचीच ही वेळ आहे, हे सरकारने लक्षात घ्यावे !