संभाजीनगर येथे महिलेसमवेत किळसवाणा प्रकार करणार्‍या पोलीस अधिकार्‍याला बडतर्फ करा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

संभाजीनगर – येथे एका महिलेचा विनयभंग करणे आणि तिच्‍याशी अत्‍यंत किळसवाणे कृत्‍य करणारे येथील साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त विशाल ढुमे यांच्‍यावर निलंबनाची कारवाई करण्‍यात आली आहे. एवढ्यावर थांबता येणार नाही, तर त्‍यांना बडतर्फ करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकतीच केली आहे.