ठाणे सेवाकेंद्रात आणलेली सनातन-निर्मित धूम्रवर्णी नवीन श्री गणेशमूर्ती पहातांना साधकांना आलेल्‍या अनुभूती !

४.११.२०२१ या दिवशी ठाणे सेवाकेंद्रात सनातन-निर्मित नवीन धूम्रवर्णी आणि हातात आयुधे असलेली श्री गणेशमूर्ती आणण्‍यात आली. त्‍या संदर्भात साधकांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. श्रीमती संध्‍या काटदरे : ‘मला मूर्ती चैतन्‍यदायी वाटली. मूर्तीचे हात, पाय आणि डोळे मला पुष्‍कळ सजीव असल्‍याचे जाणवले.’

२. सौ. नेहाली शिंपी 

अ. ‘मला मूर्तीच्‍या डोळ्‍यांत मारकतत्त्व जाणवले.

आ. मला मूर्तीवर गुलाबी प्रकाश असल्‍याचे जाणवले.

इ. रामनाथी आश्रमात वायुतत्त्व वाढल्‍याने जशा ‘भिंती हलत आहेत’, असे जाणवते, तसेच मला येथेही जाणवले. ‘गणपति त्‍याच्‍या पायांचे अंगठे माझ्‍याकडे करत आहे’, असे मला जाणवले.

ई. मूर्तीच्‍या हातांतील आयुधांकडे पाहिल्‍यावर ‘युद्धाला आरंभ करतांना जशी आयुधे हातात घट्ट धरतात, तशी श्री गणेशाने आयुधे हातात घट्ट धरली आहेत’, असे मला जाणवले.

उ. मला ‘मूर्तीच्‍या एका हातात त्रिशूळ आहे’, असे जाणवले.’

३. सौ. पिरोज जाधव

अ. ‘गणपतीचे हात आणि त्‍याची कंबर यांवर असलेला नाग हलत आहे’, असे मला दिसले.

आ. गणपतीच्‍या डोळ्‍यांमध्‍ये मला तेजतत्त्व आणि मारकतत्त्व दिसले.

इ. ३.११.२०२१ या दिवसापासून ध्‍यानमंदिरात सुगंध येत होता आणि ‘४.११.२०२१ या दिवशी सुगंध अधिकच वाढला आहे’, असे मला जाणवले.’

४. कु. केतकी शिंपी : ‘मला श्री गणेशमूर्तीत चैतन्‍य जाणवले.’

५. श्री. सतीश बांगर : ‘श्री गणेशमूर्तीत मारक तत्त्व आहे’, असे मला जाणवले.’

६. कु. सनातन बुगडे : ‘मूर्तीची सेवा करतांना ‘श्री गणेशमूर्तीत सजीवपणा जाणवून त्‍याचे हात हलत आहेत आणि मी गणेशलोकात आहे’, असे मला जाणवले.’

७. सौ. शर्मिला बांगर : ‘मला मूर्तीमध्‍ये आणि मूर्तीच्‍या डोळ्‍यांत जिवंतपणा जाणवला. मूर्तीचे हात आणि सोंड हलत असून ‘मूर्तीतून चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे. ‘मूर्ती आशीर्वाद देत आहे’, असे मला जाणवले.’

८. कु. सिद्धार्थ देवघरे : ‘मूर्ती सजीव असून गणपति मला आशीर्वाद देत आहे आणि ‘मूर्तीतून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २४.१२.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्‍यात आलेल्‍या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्‍तीनुसार साधकांच्‍या वैयक्‍तिक अनुभूती आहेत. त्‍या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक