‘सनातनचे समष्टी स्तरावरील कार्य चालू झाल्यावर वाईट शक्तींनी त्याला विरोध म्हणून विविध स्तरांवर आणि विविध माध्यमांतून त्रास देण्यास आरंभ केला. या त्रासांमुळे सनातनला अनेक संतांकडून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी करावयाचे विविध उपाय शिकणे शक्य होत आहे. त्रासाच्या निवारणासाठी विविध उपचारपद्धती शोधून काढता आल्या आणि काळानुसार सनातनला त्यांवरही विपुल प्रमाणात संशोधन करता आले. सध्याच्या काळात महर्षींच्या माध्यमातूनही विविध उपचारपद्धती कळत आहेत. साधकांना काही वर्षे हे त्रास सहन करावे लागले असले, तरी त्यातून पुढील अनेक पिढ्यांसाठी या उपायपद्धती सिद्ध झाल्या आहेत.’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.१२.२०२२)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत |