‘ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी केली ‘धर्म सेन्‍सॉर बोर्ड’ स्‍थापन केल्‍याची अधिकृत घोषणा !

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

‘ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी १० सदस्‍यीय ‘धर्म सेन्‍सॉर बोर्ड’ स्‍थापन केल्‍याची अधिकृत घोषणा केली. हे बोर्ड हिंदूंच्‍या देवता आणि संस्‍कृती यांचा अवमान करणारे चित्रपट, वेब सिरीज आदींवर लक्ष ठेवणार आहे. या मंडळाचे अध्‍यक्ष स्‍वत: शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती हे आहेत. शंकराचार्य म्‍हणाले की, सध्‍या सरकारने स्‍थापन केलेल्‍या केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्‍सॉर बोर्डाने) प्रमाणपत्र दिलेेल्‍या चित्रपटांमध्‍ये लोकांच्‍या भावना दुखावणारी अनेक दृश्‍ये आढळतात. परिनिरीक्षण मंडळात धार्मिक व्‍यक्‍तींचा समावेश करण्‍याची मागणी आम्‍ही वारंवार केली आहे; पण ही मागणी मान्‍य झालेली नाही. त्‍यामुळेच आम्‍ही आमचे स्‍वतःचे सेन्‍सॉर बोर्ड स्‍थापन केले आहे.’

संपादकीय भूमिका : देवतांचा अवमान करणारे चित्रपट बंद करण्‍यासाठी प्रशासन प्रयत्न का करत नाही ? शंकराचार्यांना यात लक्ष घालावे लागते, हे लज्‍जास्‍पद !