हलाल मांस आणि उत्पादने यांच्या निर्यातीच्या संदर्भात केंद्रशासनाकडून प्रारूप सिद्ध !

१७ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि प्रतिक्रिया व्यक्त करण्याची सुविधा

नवी देहली – केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व मांस आणि त्यासंदर्भातील उत्पादने यांना ‘हलाल प्रमाणित’ करून निर्यात करण्याच्या संदर्भात दिशानिर्देश देण्याविषयी एक प्रारूप सिद्ध केले आहे. हे प्रारूप अंतिम झाल्यावर योग्य प्रमाणपत्र घेतल्यानंतरच हलाल मांस आणि त्या संदर्भातील उत्पादने निर्यात करण्याची अनुमती मिळणार आहे.

हे प्रमाणपत्र ‘भारतीय गुणवत्ता परिषद’च्या मंडळाने मान्यता दिलेल्या शाखांकडूनच देण्यात येणार आहे. सध्या हे प्रारूप जनता आणि उद्योग क्षेत्र यांच्यासाठी सिद्ध करण्यात आले आहे. ते यावर येत्या १७ फेब्रुवारीपर्यंत सूचना आणि प्रतिक्रिया देऊ शकणार आहेत.