लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर !

नवी देहली – ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिह्यू’ या जगातील विविध देशांच्या जनगणनेवर लक्ष ठेवणार्‍या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारताने वर्ष २०२२ मध्येच लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकले आहे. त्यामुळे आता भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. वर्ष १९६१ नंतर प्रथमच चीनमध्ये लोकसंख्या वाढीचे प्रमाण घसरले, असे यात संस्थेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. वर्ष २०२२ च्या शेवटी भारताची लोकसंख्या १४१ कोटी ७० लाख इतकी होती, तर चीनच्या अहवालानुसार त्यांची लोकसंख्या १४१ कोटी २० लाख इतकी आहे. भारतापेक्षा चीनची लोकसंख्या ५० लाखांनी अल्प आहे. एप्रिल २०२३ पर्यंत भारताची लोकसंख्या १४३ कोटींच्या पुढे जाईल, असा अंदाज आहे.

गेल्या वर्षी चीनमध्ये १ कोटी ४१ सहस्र लोकांचा मृत्यू झाला. मागील २ मासांत  ६० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्य झाला. एकीकडे मृत्यूचा वेग वाढत आहे, तर लोकसंख्या वाढीचे प्रमाण अल्प झाले आहे.

संपादकीय भूमिका 

स्वातंत्र्यपासून आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस प्रयत्न न केल्याचाच हा परिणाम आहे !