भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा जे.पी.नड्डा

डावीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा

देहली – भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाचे सक्षम संघटक, नेते आणि सर्व कार्यकर्ते यांचे प्रेरणास्थान आदरणीय जे.पी. नड्डा यांची फेरनिवड झाली आहे. याविषयी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जे.पी. नड्डा यांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांनी म्हटले आहे की, जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना लोकांच्या सेवेत वाढली आणि भक्कम झाली. मला निश्चिती आहे की, पक्ष आणखी भक्कम होईल आणि आपण सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली अंत्योदयाच्या (देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याच्या) मार्गावर कार्य करत राहू.