‘लव्ह जिहाद’चा आरोपी चांद महंमद म्हणतो, ‘‘मी हिंदू होण्यास सिद्ध !’’

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे वर्ष २०२१ मध्ये एका हिंदु तरुणीला स्वतःचे हिंदु नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी विवाह करणारा विवाहित चांद महंमद याच्या विरोधात या तरुणीने मारहाणीची तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यानंतर आता चांद महंमद हिंदु होण्यास सिद्ध झाला आहे.

१. चांद महंमदशी विवाह केलेल्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे की, माझा मुसलमान पती माझा छळ करतो. त्याला पाहिजे तेव्हा तो मला मारतो. त्याने तो स्वतः हिंदु असल्याचे सांगून माझ्याशी लग्न केले होते.

२. याविषयी चांद महंमद म्हणाला की, मला माझ्या पत्नीला घरी न्यायचे आहे. मी तिला जाणूनबुजून दुखावलेले नाही. रागाच्या भरात झालेल्या चुका मी सुधारीन. मी नव्या आयुष्याला प्रारंभ करीन. मी माझा धर्मही पालटणार आहे. मी शनि मौर्य होईन.

संपादकीय भूमिका 

हिंदु तरुणीची फसवणूक करणार्‍या चांद महंमदवर कोण विश्‍वास ठेवणार ? अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !