संभाजीनगर – येथील ‘रेमंड कंज्युमर केअर’ आस्थापनात काम करतांना पर्यवेक्षक इस्माईल पठाण हा २५ वर्षीय विवाहित महिलेच्या अंगाला स्पर्श करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असे. विरोध केल्यास वेतन कापण्याची आणि घरच्यांकडे तक्रार करण्याची धमकी तिला देत असे. वेळोवेळी समजावूनही त्रास अल्प होत नसल्याने वैतागून विवाहित महिलेने ७ जानेवारी या दिवशी विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने २ पाने भरून आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. ही घटना औद्योगिक वाळूज परिसरात घडली. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. वाळूज पोलीस ठाण्यात पठाण याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पीडिता आणि तिचा पती दोघेही व्यवसायानिमित्त वाळूज औद्योगिक परिसरात वर्ष २०१३ पासून वास्तव्यास आहेत. दोघेही स्वत:ची उपजीविका भागवण्यासाठी वरील आस्थापनात काम करतात. महिलेच्या पतीनेही पठाण याच्या मित्राच्या वतीने ‘पत्नीला त्रास देऊ नको’, अशी विनंती पठाण याला केली होती. यानंतर काही दिवस त्याने महिलेला त्रास देणे बंद केले होते; मात्र पठाण याने पुन्हा महिलेला त्रास देणे चालू केले.
संपादकीय भूमिका
|