‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाणार्‍या मुसलमान प्रियकरासह त्याच्या साथीदाराला अटक !

कसारा येथील जंगलात तरुणीचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण

(‘लिव्ह इन रिलेशनशिप’ म्हणजे विवाह न करता एकत्र रहाणे)

प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील कसारा भागातील जंगलात ५ जानेवारी या दिवशी एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी कसारा पोलीस ठाणे येथे अज्ञात मारेकर्‍यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या अन्वेषणात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या वादातून २२ वर्षीय तरुणीची तिच्या मुसलमान प्रियकराने मित्राशी संगनमत करून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी रिझवान आणि अर्शद यांना अटक केली आहे.

१. ही तरुणी मागील वर्षभरापासून भिवंडी येथे तिचा प्रियकर रिझवान याच्यासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहात होती. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होऊन खटके उडायचे. त्यामुळे रिझवानने मित्र अर्शदशी संगनमत करून तरुणीच्या हत्येचा कट रचला होता.

२. त्याने तरुणीला फिरण्याच्या निमित्तानेे दुचाकीवरून वारलीपाडा गावातील जंगलात जाणार्‍या रस्त्यावर आणले. त्यानंतर तेथे तिच्यावर चाकूने अनेक वार करून तिची निर्घृण हत्या केली आणि दोघेही घटनस्थळावरून पसार झाले.

३. कसारा पोलिसांनी २४ घंट्यांतच आरोपींच्या मुसक्या आवळळ्या.

संपादकीय भूमिका

  • ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे दुष्परिणाम जाणून तरुणींनी आता तरी सतर्क व्हावे !