मुंबई – विश्व हिंदु परिषदेने गेल्या ५ वर्षांत देशात झालेल्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांची आकडेवारी घोषित केली आहे. त्यानुसार वर्ष २०१८ ते २०२२ या ५ वर्षांत पोलीस ठाण्यांत नोंद झालेली सुमारे ४०० लव्ह जिहादची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या आकडेवारीनुसार सर्वाधिक १०५ प्रकरणे उत्तरप्रदेशात घडली आहेत. त्या खालोखाल मध्यप्रदेशात ३०, हरियाणा आणि केरळ राज्यांत १३, देहलीमध्ये १२, महाराष्ट्रात ९ तर बिहारमध्ये ४ ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे घडली आहेत. या प्रकरणांची पोलीस ठाण्यात तक्रारी झाल्यामुळे ही आकडेवारी मिळाली आहे; मात्र जी प्रकरणे पोलीस ठाण्यांपर्यंत पोचलेली नाहीत, ती याहून अधिक असण्याची शक्यता आहे.
#देशात ‘#लव्ह_जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; देशपातळीवर #धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज
https://t.co/ZVql6a1PfF@VHPDigital @HMOIndia#vishwahinduparishad #law #LoveJihad #NewsUpdate— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) January 7, 2023
संपादकीय भूमिकादेशातील ५ राज्यांत सध्या ‘लव्ह जिहाद’मुळे होणार्या धर्मांतराच्या विरोधात कायदे करण्यात आले आहेत. अशा प्रकारचा कायदा संपूर्ण देशासाठी करण्याची आवश्यकता आहे. तसेच केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्यात कठोर शिक्षेची तरतूद हवी. त्यासह हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडणार नाहीत, यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन धर्माचरण करण्यासाठी सिद्ध करण्याची आवश्यकता आहे ! |