राजकुमार विलियमने मला मारहाण केली होती !

ब्रिटीश राजकुमार प्रिंस हॅरीच्या जीवनचरित्रात उल्लेख !

ब्रिटीश राजकुमार प्रिंस हॅरी व राजकुमार विलियम

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या राजघराण्यातील राजकुमार प्रिंस हॅरी यांनी त्यांचे ‘स्पेयर’ या नावाने जीवनचरित्र लिहिले आहे. यात त्यांनी त्यांचा मोठा भाऊ राजकुमार विलियम यांच्यावर आरोप केले आहेत. यात राजकुमार विलियम यांनी मारहाण केल्याचाही आरोप आहे.

१. राजकुमार हॅरी यांनी लिहिले आहे की, विलियम याच्यासमवेत झालेल्या वादानंतर त्याने माझ्या शर्टची कॉलर पकडली आणि मला खाली आपटले. मी एखाद्या कुत्र्यासारखा खाली पडलो. माझे कपडे फाटले आणि माझ्या पाठीला दुखापत झाली. काही क्षण मी तसाच पडून राहिलो. मी चकीत झालो होतो. नंतर मी उभा राहिलो आणि विलियम याला बाहेर जाण्यास सांगितले; मात्र तो तेथेच उभा राहिला.

२. या पुस्तकात पुढे असेही म्हटले आहे की, माझ्या पाठीवर अद्यापही त्या वेळेच्या दुखापतीच्या खुणा आहेत. मी या घटनेची माहिती माझी पत्नी मेगन हिला सांगितली नाही; मात्र तिने माझी पाठ पाहिल्यावर तिला दुखापतीचे व्रण दिसले. तिला जेव्हा मी याविषयी सांगितले, तेव्हा ती दुःखी झाली. विलियमने माझ्या पत्नीला ‘धोकादायक’ आणि ‘असभ्य’ म्हटले होते.