काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – सुरक्षादलाच्या सैनिकांनी काश्मीरच्या सिधरा येथे ३ जिहादी आतंकवाद्यांना ठार केले. (जोपर्यंत आतंकवाद्यांची निर्मिती करणार्‍या पाकला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासकट नष्ट होणार नाही ! – संपादक) हे आतंकवादी ट्रकमध्ये लपून प्रवास करत होते. त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतांना झालेल्या चकमकीच्या वेळी त्यांना ठार करण्यात आले.