‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी ! – येवला येथील धर्माभिमान्यांंची मागणी

येवला (जिल्हा नाशिक) येथे नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

(१) नायब तहसीलदारांना निवेदन देतांना धर्माभिमानी

येवला (जिल्हा नाशिक) – धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी सर्वश्री नीलेश माडीवाले, किशोर सोनवणे, सुभाष पैलवान पाटोळे, सोमनाथ गुंड, रमेश भरते, झुंजारराव देशमुख, बर्दीविशाल भंडारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात धर्माभिमानी आणि व्यापारी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

‘हलाल प्रमाणपत्र’ रहित होण्यासाठी जनतेला कधीपर्यंत लढा देत रहावा लागणार ?