मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

३ अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – लोअर परळ येथील १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या युवकांवर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यांतील ३ आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

आरोपींमधील एक पीडितेचा मित्र असून हे दोघेही अन्य मित्राच्या वाढदिवसासाठी चाळीत गेले होते. त्या वेळी तेथे अन्य ५ आरोपी उपस्थित होते. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून रहिवाशांनी पोलीस ठाण्यात कळवले. पोलिसांनी आरोपींना कह्यात घेतले. २३ डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडला.