हडपसर (जिल्हा पुणे) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात

हडपसर सभेच्या निमित्ताने हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांना मिळत आहे अभूतपूर्व प्रतिसाद !

हडपसर (जिल्हा पुणे), २३ डिसेंबर (वार्ता.) –  १ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार आता शिगेला पोचला आहे. वैयक्तिक संपर्क, सामाजिक प्रसारमाध्यमे, विविध ठिकाणी फलकप्रसिद्धी यांद्वारे सहस्रो लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात येत आहे. हिंदुत्वनिष्ठ संघटना, वारकरी संप्रदाय, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, धर्मप्रेमी आदींना प्रत्यक्ष संपर्क साधून केलेल्या प्रसाराला त्यांच्याकडूनही उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धर्मशिक्षणवर्गातील महिलांही उत्स्फूर्तपणे सभेचा प्रसार करत आहेत.


_______________________________

समाजातून मिळत असलेला प्रतिसाद

पारगाव येथील युवकांना मार्गदर्शन करतांना

१. पारगाव येथे झालेल्या बैठकीत ४० धर्मप्रेमी युवक उपस्थित होते. ‘गावातील अधिकाधिक जणांना बस करून सभेला घेऊन येणार’, असे सर्वांनी सांगितले. गावात फ्लेक्स लावण्यासाठी सुद्धा सर्वजण सिद्ध झाले. ‘लव्ह जिहाद’च्या ५०० ग्रंथांची मागणी येथील युवकांनी दिली.

‘जनसेवा सह. बँक ली.’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना सभेचे निमंत्रण देतांना

२. ‘जनसेवा सह बँक ली.’चे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना सभेचे निमंत्रण दिल्यावर त्यांनी ‘सभेला सर्व कर्मचार्‍यांना उपस्थित रहाण्यासाठी सांगतो’, असे सांगितले.

सोरतापवाडी चोरघे लॉन्स येथे दिंडीला आलेल्या वारकर्‍यांची बैठक

३. सोरतापवाडी ‘चोरघे लॉन्स’ येथे दिंडीला आलेल्या वारकर्‍यांच्या बैठकीला ६५ वारकरी स्त्री-पुरुष उपस्थित होते. चिंतामणी वारकरी दिंडीच्या अध्यक्षांनी बैठकीच्या शेवटी जाहीर केले की, आम्ही सर्वजण दिंडी घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम घेत १२५ ते १५० वारकरी धर्मसभेला अवश्य येणार.

स्वामी समर्थ मंदिरात उपस्थित भाविकांना विषय सांगण्यात आला

४. काळेबोराटेनगर, तुकाई टेकडी, हडपसर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात ४०० भाविकांना विषय सांगून सभेचे निमंत्रण देण्यात आले. सर्वांनी अतिशय शांतपणे विषय ऐकून घेतला आणि ‘सभेला येणार’, असे सांगितले.

आदर्श अभ्यासिका, शिंदे हाईट्स, वडगाव बुद्रुक येथे सभेचा विषय युवक-युवती यांना सांगितला
धर्माभिमानी स्वयंप्रेरणेने भित्तीपत्रके लावतांना
‘पुणे जिल्हा भूमाता पर्यावरण’ अध्यक्ष दत्तात्रय शेडगे स्वयंप्रेरणेने रिक्शावर सभेचे भित्तीपत्रक लावतांना

५. ‘पुणे जिल्हा भूमाता पर्यावरण’ अध्यक्ष दत्तात्रय शेडगे यांनी स्वयंप्रेरणेने रिक्शावर सभेचे भित्तीपत्रक लावले.


#हडपसर (पुणे) येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला येण्यासाठी कोलवडी येथील रणरागिणी सज्ज !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा
वार : रविवार
दिनांक : १ जानेवारी २०२३
वेळ : सायं. ६ वा.
स्थळ : कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, प्रगती शाळेजवळ, काळेबोराटे नगर (काळेपडळ), हडपसर, पुणे

#पुणे #Pune #Hjs #hindu #hinduism #Dharma #HinduRashtra #हिंदु #sunday

_______________________________________