२ लाख रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकार्‍याला पकडले !

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – येथे साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नूतनीकरण करण्यास साहाय्य केल्याविषयीचा मोबदला, तसेच कारखान्याकडून हवा आणि पाणी प्रदूषण होत असल्याने लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अजित वसंतराव पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. (असे कर्तव्यचुकार अधिकारी काय कामाचे ? – संपादक)

संपादकीय भूमिका

भ्रष्ट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ !