दुचाकीवरील ‘बजरंग बली’ शब्द न काढल्यास ठार मारू !

  • चितोडगड (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाला धमकी !

  • पोलिसांनी कारवाई न केल्याने हिंदु संघटनांकडून पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने !

प्रतिकात्मक छायाचित्र

चितोडगड (राजस्थान) – येथे मुकेश भोई या हिंदु तरुणाला काही धर्मांधांनी त्याच्या दुचाकीवर लिहिलेला ‘बजरंग बली’ शब्द न हटवल्यास ठार मारण्याची धमकी दिली. याची माहिती पोलिसांनी दिल्यानंतर त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याने हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर निदर्शन केली. कार्यकर्त्यांनी धर्मांधांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्‍वासन दिल्यानंतर ते माघारी परतले. पोलीस आता धर्मांधांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

  • राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदूंवरील अत्याचारांविषयी याहून वेगळी स्थिती काय असणार ? काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट !