ज्यांनी आश्रय, रोजगार आणि अन्न दिले, त्यांच्यावरच उलटले !

अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांची फ्रान्समधील शरणार्थी मुसलमानांवर टीका

भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

नवी देहली – कतारमध्ये फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा चालू आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात फ्रान्सने आफ्रिकेतील मोरोक्को या इस्लामी देशाच्या संघाचा पराभव केला. यानंतर फ्रान्समध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या मुसलमानांनी  हिंसाचार आणि जाळपोळ केली. यापूर्वीही उपांत्यपूर्वी फेरीचा सामना जिंकल्यानंतरही त्यांनी हिंसाचार केला होता. यावरून भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय ट्वीट करून म्हणाले की, फ्रान्सने त्यांना आश्रय आणि रोजगार दिला. त्यांना अन्न आणि घर दिले; मात्र फ्रान्सच्या विजयामुळे त्यांना आनंद झाला नाही, उलट मोरोक्कोच्या पराजयाने ते संतप्त झाले. जर विकास केल्यामुळे धार्मिक उन्माद अल्प झाला असता, तर मोरोक्कोच्या पराभवामुळे फ्रान्मधील शरणार्थींनी जाळपोळ केली नसती.

भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनीही अशा प्रकारचे ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, फ्रान्सने या लोकांना भुकेपासून वाचवले, त्यांना आश्रय दिला, त्यांच्या प्राणांचे रक्षण केले, तसेच त्यांना सुरक्षा पुरवली. ज्या धर्माविषयीच्या आंधळेपणामुळे पत्नी आणि मुलांसमवेत पलायन करून फ्रान्समध्ये यावे लागले, त्याच धर्माच्या आंधळेपणामुळे फ्रान्सला ते जाळत आहेत. गुरु गोविंद सिंह यांनी हे सत्य काही शतकांपूर्वीच सांगितले होते.

संपादकीय भूमिका

  • यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल होऊन पाकमधील हिंदू भारतात आणि भारतातील मुसलमान पाकमध्ये जाणे अपेक्षित होते. ते न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !