विविध सेवांचे दायित्व लीलया सांभाळणारे देवद आश्रमातील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निनाद गाडगीळ यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजेंद्र सांभारे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. निनाद गाडगीळ

१. शांत, हसतमुख आणि खेळकर स्वभाव

‘निनाददादा स्वभावाने शांत, हसतमुख आणि खेळकर आहेत. त्यांना सर्व साधकांविषयी आदरभाव आहे. विशेषतः वयस्कर साधकांविषयी त्यांना आपलेपणा आहे. ते त्यांना सर्व साहाय्य करतात.

२. नीटनीटकेपणा

दादांचा पोशाख साधा असला, तरी व्यवस्थित असतो. ते नेहमी स्वच्छ आणि टापटीप रहातात.

श्री. राजेंद्र सांभारे

३. अभ्यासू वृत्ती

अ. दादा साधकाला सेवा देतांना त्याची प्रकृती आणि सेवा यांचा नीट अभ्यास करतात. साधकाची क्षमता पाहून ‘सेवा कशी चांगली होईल ?’, असा विचार ते करतात. साधकांच्या सेवेवर त्यांचे बारकाईने लक्ष असते.

आ. त्यांनी वेळोवेळी माझ्याकडून झालेल्या चुकांमधील बारकावे आणि स्वभावदोष सांगून मला साहाय्य केले.

इ. मी निनाददादांना कधीही रागावलेले अथवा चिडलेले पाहिले नाही. ते कायम संयमाने आणि शांतपणे सत्संग घेऊन प्रसंग सोडवतात. एखाद्या सूत्राची केवळ एकच बाजू जाणून घेण्याऐवजी ते दोन्ही बाजू समजून घेतात. तेव्हा ते कौशल्यपूर्णरित्या सत्संगच घेतात आणि ‘योग्य काय ?’, ते सांगून सर्वांना आनंदी करतात.

ई. आश्रमातील पत्रव्यवहार दादाच कौशल्यपूर्ण रितीने करतात. कोणत्याही स्वरूपाचे पत्रलेखन करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. ते सर्व प्रकारची नमुनापत्रे मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांत सिद्ध करतात.

४. प्रेमभाव

दादांमध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. काही वेळा ते मला एखादी वेगळी सेवा सांगतात. तेव्हा ‘ते माझ्यावरील प्रेमापोटी ती सेवा सांगतात’, असे मला जाणवते आणि मला त्यांचे विशेष कौतुक वाटते. त्यांच्यामुळे मला वेगवेगळ्या सेवा करण्याची आणि शिकण्याची संधी मिळते.

५. विविध सेवांचे दायित्व लीलया सांभाळणे

अ. निनाददादांनी मला आश्रमसेवांमध्ये सहभागी करून घेतांना माझ्या शारीरिक अडचणी जाणून घेतल्या. माझी शारीरिक क्षमता पाहून मला जमतील, अशाच सेवांमध्ये मला सहभागी करून घेतले.

आ. मध्यंतरी माझे एक शस्त्रकर्म झाले. तेव्हा त्यांनी माझ्या संपर्कात राहून मला आधार दिला. त्या कालावधीत त्यांनी मला विश्रांती घेण्याचा आग्रह केला. तेव्हा मी ५ मास सेवेत नव्हतो. ते वेळोवेळी माझी प्रेमाने विचारपूस करायचे. त्यामुळे मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव आणि साधकांची काळजी करणे’, या गुणांची जाणीव झाली.

६. सहजतेने जवळीक साधणे

दादांची प्रत्येक साधकाशी जवळीक आहे. त्यामुळे साधकांना दादांचा आधार वाटतो. त्यांना घरगुती अडचणीही आहेत. त्याही ते सर्व लीलया सांभाळतात. अधिकोषातील कामे करणे, बाजारातून साहित्य आणणे, घरातील स्वच्छतेमध्ये साहाय्य करणे इत्यादी घरची कामेही ते करतात.

निनाददादांमधील गुण आणि साधकत्व यांमुळे ‘गुरुकृपेने ते पुढील प्रगती करतील’, असे मला जाणवते.’

– श्री. राजेंद्र नारायण सांभारे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.५.२०२०)