संभाजीनगर येथे ८ मासांत ४० लाख २० सहस्र लिटर मद्याची विक्री !

प्रतिकात्मक छायाचित्र

परभणी – गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० मासांतच मराठवाडा येथील ८ जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीने उच्चांक गाठला आहे. मराठवाडा येथील ८ जिल्ह्यांत बिअरच्या विक्रीत तब्बल ८०.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात एकट्या परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मद्याची विक्री ६ लाख लिटरने वाढली आहे. हे प्रमाण १२३.२१ टक्के आहे. त्याखालोखाल हिंगोली जिल्ह्यात मद्यविक्रीचे प्रमाण १०४ टक्क्यांनी वाढले असून संभाजीनगर येथे १० मासांत ४० लाख लिटर मद्याची विक्री झाली आहे.

यंदा मद्यविक्रीत वाढ ! – उत्पादन शुल्क विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार म्हणाले, ‘‘मागील २ वर्षांच्या तुलनेत यंदा मद्यविक्रीत वाढ झाली आहे. परवान्यांची मागणीही वाढत आहे. यात तरुणांची संख्या अधिक आहे.’’

संपादकीय भूमिका

  • हे महाराष्ट्र राज्याला अशोभनीय आहे ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने तात्काळ कठोर प्रयत्न करणे आवश्यक आहे !