इस्लामी देश मोरोक्कोच्या विजयानंतर फ्रान्समध्ये समर्थक मुसलमानांकडून हिंसाचार !

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धा

पॅरिस (फ्रान्स) – कतार देशात चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये आफ्रिका खंडातील इस्लामी देश मोरोक्कोने पोर्तुगालचा पराजय केल्यानंतर फ्रान्समध्ये अनेक ठिकाणी दंगली झाल्या. या वेळी मोरोक्कोच्या समर्थक मुसलमानांनी पोलिसांवर आक्रमण केले, तसेच दगडफेकही केली. यासह पोलिसांवर लाठीमारही करण्यात आला. दंगलखोर मुसलमानांनी गाड्या आणि दुकाने यांची तोडफोड केली. त्यांना रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

मोरोक्कोच्या विजयानंतर मोठ्या संख्यने समर्थक रस्त्यावर उतरले होते. सहस्रोंच्या संख्येने ते पॅरिसमधील प्रसिद्ध पेरिसियन चौकात गोळा झाले. तेथे त्यांनी घोषणाबाजी केली, तसेच गाड्यांचे ‘हॉर्न’ वाजवून गोंगाट केला. त्यानंतर त्यांनी हिंसाचार चालू केला.

संपादकीय भूमिका

‘इस्लाम’ म्हणजे ‘शांतता’ असा अर्थ असतांना विजयानंतरही हिंसाचार करणारे मुसलमान त्याचा अवमानच करत आहेत, असेच कुणालाही वाटेल !