निपाणी – आनिगोंदी, हम्पी येथील श्रीक्षेत्र अंजानांद्री येथील अंजेदर्शन आणि पवमान यज्ञासाठी निपाणीसह परिसरातील सहस्रो भाविक (मालाधारक) रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी मालाधारकांनी शहरातील विविध मार्गांवरून मिरवणूक काढली. यात कर्नाटक सरकारच्या वक्फ, हज आणि धर्मादायमंत्री सौ. शशिकला जोल्ले, युवानेते श्री. बसवप्रसाद जोल्ले, समाधी मठातील पू. प्राणलिंग स्वामी यांसह अन्य उपस्थित होते. मंत्री सौ. शशिकला जोल्ले यांनी बसला भगवा ध्वज दाखवून त्या मार्गस्थ केल्या. या प्रसंगी नगराध्यक्ष श्री. जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष सौ. नीता बागडे, सभापती श्री. राजू गुंदेशा, श्री. संतोष सांगावकर यांसह अन्य उपस्थित होते.
हनुमान माला संकीर्तन यात्रेला बेळगावमधून हनुमान मालाधारी रवाना !
बेळगाव – हनुमान माला संकीर्तन यात्रेला बेळगावमधून बजरंग दल, तसेच हनुमान मालाधारी रवाना झाले आहेत. तत्पूर्ती मारुतिगल्ली येथील मारुति मंदिरात हनुमान चालीसा पठण करून तरुणांनी हनुमान माला धारण केली. हे युवक अंजनांद्री पर्वतावर जाऊन धार्मिक कार्यक्रम करणार आहेत. उत्तर कर्नाटकातील १७ जिल्ह्यांतून गेल्या ३ मासांपासून अंजनांद्री टेकडी वाचवण्याची ही चळवळ चालू आहे. येथे ६० सहस्रांहून अधिक मालाधारी एकत्रित हनुमानचालीसा पठण करणार आहेत.