राष्ट्रीय समन्वयक अधिवक्ता अविनाश भोसीकर यांची चेतावणी
सोलापूर – येथे चांगल्या स्थितीत चालू असलेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना बंद पडावा, यासाठी कटकारस्थान रचणे चालू आहे. हे कारस्थान लिंगायत समन्वय समिती सहन करणार नाही. कारखाना बंद पाडल्यास राज्यातील लिंगायत समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, अशी चेतावणी राष्ट्रीय समन्वयक अधिवक्ता अविनाश भोसीकर यांनी दिली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी विजयकुमार हत्तुरे, सकलेश बाभूळगांवकर, शिवलिंग अचलेरे, धोंडप्पा तोरणगी, अमित रोडगे आदी उपस्थित होते.