सिवूड बेथेल गॉस्पेल चर्चवर ८ दिवसांत कारवाई करण्यात यावी !

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी

चित्रा वाघ

नवी मुंबई – सिवूड बेथेल गॉस्पेल चर्चच्या वतीने अनधिकृतपणे चालू असलेल्या आश्रमामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्यात आले होते. या ठिकाणची पाहणी करून या अनधिकृत आश्रमावर ८ दिवसांत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी वाशी येथे केली. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या प्रकरणी वाघ यांनी महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, तसेच पोलीस आयुक्त यांची भेट घेतली.

आश्रमामध्ये काचेची पेटी आहे. तेथे मुला-मुलींचे धर्मांतर केले जाते का ? अद्याप तेथे २ मुली आहेत. कुणाच्या साहाय्यामुळे आश्रम चालू आहे ? आश्रमच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्याने अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सौ. वाघ यांनी या वेळी केली.

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एका अनाथ आश्रमामध्ये अशीच घटना घडली होती, तेव्हा तेथील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अशा सर्व अनाथ आश्रमांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे, असे सौ. वाघ यांनी या वेळी सांगितले.