इंदूर (मध्यप्रदेश) येथे इस्लाम न स्वीकारल्यास घर पाडून तेथे थडगे बनवण्याची धर्मांधांची हिंदु कुटुंबाला धमकी !

आरोपी शाहरूख

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका हिंदु कुटुंबाचा धर्मांधांनी छळ केल्याची घटना समोर आली आहे. पीडित हिंदु कुटुंबातील महिलांनी इस्लाम न स्वीकारल्यास त्यांचे घर पाडून तेथे कबर (मुसलमानांचे थडगे) बांधण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच शाहरूख, जावेद आणि अजीज अशी धमकावणार्‍यांची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहरूख सध्या कारावासात आहे.


१. प्रसारमाध्यमातील एका वृत्तानुसार कुम्हेडी कंकर परिसरात रहाणार्‍या एका हिंदु कुटुंबाने शाहरूख आणि इतर २ जण यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

२. शाहरूख पीडित कुटुंबातील महिलांना सतत धमकावत असतो. काही दिवसांपूर्वी शाहरूख, अजीज आणि जावेद पीडितेच्या घरी पोचले. शाहरूख याने पीडित हिंदु महिलेले  घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.

३. शाहरूख याचा साथीदार अजीज याने पीडितेच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. हिंदु कुटुंबाला कापून फेकून देण्याची धमकी जावेद याने दिली, असे तक्रारीत पुढे म्हटले आहे.

४. तक्रार मागे घेण्यासाठी या सर्वांनी दबाव टाकल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

५. ज्या ठिकाणी हिंदु कुटुंबाचा छळ केला जात आहे, तेथे मुसलमान समाजाची २ -३ घरेच असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

अशा धमक्या द्यायला इंदूर भारतात आहे कि पाकिस्तानात !