(म्हणे) ‘धार्मिक भावना भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक ‘लव्ह जिहाद’सारखी सूत्रे पुढे केली जात आहेत ! – छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे – सध्या धार्मिक भावना भडकवण्यासाठी जाणीवपूर्वक विविध प्रकार अवलंबले जात आहेत. यामागे हिंदू-मुसलमान लढाई चालू झाली पाहिजे, हाच हेतू असून त्याद्वारे निवडणुकीसाठी लाभ होऊ शकेल, अशी त्यांची भावना झाली आहे. त्यातूनच‘लव्ह जिहाद’सारखी सूत्रे जाणीवपूर्वक पुढे केली जात आहेत. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालले आहेत. या सर्व प्रश्नांना फाटा देणे आणि या मूळ प्रश्नांवर पांघरून घालणे, हाही एक उद्देश या ‘लव्ह जिहाद’ या सूत्राच्या मागे आहे, असे विधान माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महात्मा जोतिराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त  अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने पुण्यातील समता भूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांना नाशिक येथील ‘लव्ह-जिहाद’ विषयावर काढण्यात आलेल्या मोर्चाविषयी विचारले असता, त्यांनी हे मत व्यक्त केले. (‘श्रद्धा वालकर हिच्या शरिराचे तुकडे करणारा ‘आफताब’ आणि बुरखा घालत नाही, म्हणून भररस्त्यात रूपाली चंदनशिवे हिचा गळा चिरणारा ‘इक्बाल शेख’ या प्रकरणांमध्ये ‘लव्ह जिहाद’ दिसत नाही का ? नाशिक येथे लव्ह जिहाद विरोधात निर्माण झालेले हिंदूंचे भव्य संघटन पाहून भुजबळ यांच्या पायाखालील वाळूच सरकली असल्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘लव्ह जिहाद’मध्ये सहस्रो हिंदु महिला भरडल्या जात असतांना भुजबळांसारखे नेते तो नाकारून जनतेची दिशाभूल करत आहेत आणि हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. अशांवरच कठोर कारवाई केली पाहिजे !