‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जिजाबाई यांनी संस्कार केले. जिजाबाईंनीच हिंदु साम्राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज दिले. पूर्वीच्या काळी पती लढाईला जाण्याआधी पत्नी पतीला टिळा लावून ‘लढाईत विजयी होऊन या’, असे सांगत. त्याप्रमाणेच आताही हिंदु राष्ट्राच्या कार्यात महिलांचे योगदान मोठे असेल. महिलांविना हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकणार नाही.
भारतात पूर्वीपासून प्रत्येक कार्यात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे आहे. एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते. तसेच आंदोलनातही महिलांचे योगदान मोठे आहे. परंपरा, वेशभूषा, एकता आणि सभ्यता महिलांमध्ये दिसून येतात.