भारतामध्ये घर, कुटुंब, संस्कृती सर्वकाही मिळते म्हणून मी भारतात येते !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ९ वर्षांच्या कन्येचे उद्गार

ऋषी सुनक यांची कन्या अनुष्का

लंडन (ब्रिटन) – ‘भारतामध्ये घर, कुटुंब, संस्कृती सर्वकाही मिळते; म्हणून मी भारतात येणे पसंत करते’, असे म्हणणे आहे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची ९ वर्षांची कन्या अनुष्का हिचे. येथे आयोजित ‘कुचिपुडी डान्स फेस्टिवल-रंग २०२२’ मध्ये सहभागी होण्यासाठी ती आली होती. त्या वेळी पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना तिने वरील विधान केले. या कार्यक्रमात जगभरातील ४ ते ८५ वयोगटातील १०० कलाकार सहभागी झाले आहेत.

नृत्यामुळे सर्व चिंता आणि तणाव दूर होतात !

अनुष्का म्हणाले की, मला कुचिपुडी आणि अन्य नृत्य आवडतात; कारण जेव्हा तुम्ही नृत्य करता, तेव्हा तुमच्या सर्व चिंता आणि तणाव दूर होऊन तुम्ही तुमच्या मित्रांसमवत संपूर्ण ऊर्जेद्वारे नृत्य करता.