बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात १९ सप्टेंबर या दिवशी ३ धर्मांध मुसलमानांनी राष्ट्रध्वज जाळल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) नुकताच गुन्हा नोंदवला. राष्ट्रध्वज जाळणारे मुनीर आणि यासीन यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. या तिघांचाही ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. ‘एन्.आय.ए.’नुसार तिघेही शिवमोग्ग्यात राहून कर्नाटकच्या विविध ठिकाणी आतंकवादी आक्रमणाचे षड्यंत्र रचत होते. या प्रकरणाचे धागेदोरे मंगळुरू स्फोटाशी जोडलेली असू शकते, असेही सांगितले जात आहे. मुनीर आणि यासीन यांची कसून चौकशी केली जात आहे.